फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या 'सूत्रा'चे केले कौतुक

Update: 2021-03-27 11:56 GMT

संजय राठोड प्रकरण असेल, सचिन वाझे प्रकरण असेल किंवा परमबीर सिंग यांचे प्रकरण असेल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने ठाकरे सरकारवर हल्ला सुरू ठेवला आहे. एवढेच नाही तर सरकार व्यवस्थित काम करत नसल्याची टीका त्यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही केली. कोरोनाची परिस्थितीत हाताळण्यात सरकार कसे अपय़शी ठरले याची माहिती आकडेवारीसह त्यांनी दिली. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे सरकारच्या एका कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळातील चाचण्यांच्या वाढत्या संख्येवरुन फडणवीस यांनी हे कौतुक केले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे आणि त्या म्हटले आहे की, "अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस ! चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्याी मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्याज लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली. गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा ! येणार्यार काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय ! "

Tags:    

Similar News