Fact Check : कश्मीर मधलं त्या Live Encounter व्हिडीयोचं सत्य

Update: 2019-08-05 09:54 GMT

काल पासून सोशल मिडीयावर कश्मीरमधल्या एका एन्काउंटर चा व्हिडीयो व्हायरल आहे. यात दूरदर्शनची एख रिपोर्टर एन्काऊंटरचं लाइव्ह रिपोर्टींग करताना दिसत आहे. काही अतिरेक्यांना घरात घुसून बाहेर काढलं जातं आणि त्यांचं एन्काऊंटर करून ओलीस ठेवण्यात आलेल्या गाववाल्यांना सोडवलं जातं असा हा व्हिडीयो आहे.

हा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोकांनी संताप ही व्यक्त केला. लष्करी कारवाईचं असं लाइव्ह रिपोर्टींग करणे योग्य नाही अशा प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत, तर अनेकांनी अतिरेक्यांना अशा पद्धतीने कंठस्नान घातल्याबद्दल सरकाचे अभार मानले आहेत. सरकारने अतिरेक्यांच्या बद्दल अशीच कठोर भूमिका घेतली पाहिजे असं मत ही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

[video data-width="400" data-height="248" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2019/08/WhatsApp-Video-2019-08-05-at-12.29.52.mp4"][/video]

मॅक्समहाराष्ट्रने या व्हिडीयोची सत्यता पडताळली. मॅक्समहाराष्ट्र ला आढळून आलं की हे लाइव्ह रिपोर्टींग लाइव्ह एन्काऊंटरचं नसून भारत आणि अमेरिका यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संयुक्त लष्करी कारवाईच्या मॉक ड्रील चे होते. 2016 मध्ये उत्तराखंड इथे झालेल्या मॉक ड्रीलचे हे फुटेज आहे, जे आता व्हायरल करण्यात आलं आहे.

Similar News