Fact Check | पुण्यात एका मुलीवर चाकूने हल्ला करणारा मुलगा मुस्लिम असल्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल होणारा व्हिडीओ हा “लव जिहाद” प्रकणातील असल्याचा दावा करण्यात येत होता. मॅक्स महाराष्ट्रने या व्हिडीओचे फॅक्ट चेक करत सत्य सर्वांसमोर आणले आहे.

Update: 2023-07-12 00:30 GMT


सोशल मीडीयावर एक व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर केला जातोय. ज्यामध्य एख हातात हत्यार घेऊन एका महिलेच्या मागे धावत आहे. हा व्यक्ती महिलेच्या डोक्यात कोयत्याने हल्ला करत आहे. त्यानंतर तेथील आजुबाजूचे लोक त्याला हल्ला करणाऱ्याला रोखण्यासाठी समोर आले. अस वाटतंय की हा व्हिडीओ जवळच्या कोणत्यातरी CCTV कॅमेरात कैद झाला. सोशल मीडीया वापरणारे काही जण हा व्हिडीओ पुण्याचा असल्याचं सांगत आहे. दावा आहे की हा व्यक्ती त्या मुलीचा प्रियकर होता आणि त्या महिले त्याला नकार दिला होता. काही लोक सोशल मीडीयावरील या हल्ला करणाऱ्याला “जेहादी” “जिहादी” सांगत हा व्यक्ती मुस्लिम असल्याचं म्हणत आहेत.

ट्विटर वापरणाऱ्या आयेशाने @Ayesha86627087

२७ जूनला ट्विट करत हा हल्ला करणार व्यक्ती “जिहादी” असल्याचं सांगितले

एक अजून ट्विटर हँडेल रजनी कुमारी ने @rajanikumari21

ने या व्हिडीओवर दावा करत सेम ट्विट केलं त्यात तिने म्हटलं आहे की “पुण्यात जिहादीने एकतर्फी प्रमातून मुलगीवर हल्ला केला आहे”. या ट्विट ला १० हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे, तर ३०० लोकांनी त्याला रिट्विट केलं आहे.

सोशल मीडीयावरील काही वापरकर्त्यांनी अशाच दावा केलेले व्हिडीओ पोस्ट केले आहे. पुढे अशा अनेक पोस्ट स्क्रिनशॉर्ट आहेत, ज्यामध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्ती “जिहादी” असल्याचं सांगत आहेत.

काही वापरकर्त्यांनी त्याला जबरदस्ती “लव जिहाद” म्हणुन पोस्ट केल आहे.






व्हिडिओच्या फ्रेमच्या उलट इमेजच्या शोधामुळे आम्हाला घटनेशी संबंधित बातम्यांकडे नेले. एका वृत्तवाहीनीच्या वृत्तानुसार, आरोपीला आधीच अटक करण्यात आली होती आणि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, पीडितेच्या आईने आरोपीच्या वडिलांकडे त्यांचा मुलगा तिच्या मुलीचा छळ करत असल्याची तक्रार देखील केली होती. पुण्याचे DCP संदीप सिंग गिल यांच्या अहवालात शंतनू लक्ष्मण जाधव असे आरोपीचे नाव असल्याचे लिहिले आहे.

एका इंग्लीश वृत्तानुसार, पुण्यातील सदाशिव पेठेतील विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या पेरुगेट पोलिस चौकीजवळ २७ जून रोजी ही घटना घडली. २१ वर्षीय आरोपीने पीडितेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. कारण त्याच्या असभ्य वर्तनामुळे महिलेने त्याच्यासोबतचे नाते संपवले होते. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर आणि पीडित दोघेही पुण्यातील विद्यार्थी होते.

आरोपी शंतनू लक्ष्मण जाधव हा पुण्यातील मुळशी परिसरातील डोंगरगाव येथील रहिवासी आहे. डीसीपी संदीप सिंग गिल यांनी सांगितले की, महिलेच्या डोक्याला आणि हाताला तीक्ष्ण वस्तूने दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून ती आता धोक्याच्या बाहेर आहे.


आम्हाला घटना आणि कथित हल्लेखोराविषयी समान माहिती असलेल्या इतर बातम्यांचे अहवाल सापडले. एकंदरीत पुण्यात महिलेवर चाकूने हल्ला करणारा व्यक्ती मुस्लिम असल्याचा दावा सपशेल खोटा आहे. शंतनू लक्ष्मण जाधव असे हल्लेखोराचे नाव असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.


 




 


Tags:    

Similar News