महाराष्ट्रात विधानपरिषदेसाठी 10 डिसेंबरला मतदान

Update: 2021-11-09 12:42 GMT

 राज्यातील 5 मतदारसंघातील विधानपरिषदेच्या 6 जागांवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एकूण 8 विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामदास कदम, काँग्रेस नेते भाई जगताप यांचाही समावेश आहे.

एकूण 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार असून 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मुंबई मधील दोन जागांसाठी, कोल्हापूर, धुळे, अकोला आणि नागपूर विधान परिषदसाठी निवडणूक होईल. 





 


 


येत्या 1 जानेवारी 2022 मध्ये विधान परिषदेतील 8 आमदार निवृत्त होत आहेत . त्यामध्ये रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर , अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार , गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला- बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर यांचा समावेश आहे .

Tags:    

Similar News