कोल्हापुरातील छोट्याशा घरात गेले लतादीदींचे बालपण

Update: 2022-02-06 13:38 GMT

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने देशावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. यानिमित्ताने त्त्यांच्या काही जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला आहे. लतादीदी आणि त्यांच्या भावडांचा बालपण काही काळ कोल्हापुरात गेले. मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्ष भाड्याच्या घरात राहत होते. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयाच्या भाड्याने हे मंगेशकर कुटुंबीय राहत होतं. तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेलं. त्यावेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबियांना कारेकर कुटुंबीयांनी वेळोवेळी मदत ही केली होती. लतादीदींच्या निधनाची बातमी आल्यानंतर कारेकर कुटुंबीयांनाही दु:ख अनावर झाले, त्यांनी त्यावेळच्या आठवणी जागवल्या.

Similar News