पुण्यात जगदीशब्द फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीसूर्य आणि क्रांतीज्योती पुरस्काराचे वितरणस राजू शेट्टींचीही उपस्थिती

Update: 2022-12-02 13:16 GMT

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमीत्त जगदीशब्द फाऊंडेशनच्या वतीने शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीज्योती आणि क्रांतीसूर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

क्रांतिसूर्य महात्मा फुले हे शिक्षकांच्या आधी शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आसूड ओढला व ब्रिटिशांना जागे केले. स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देशात शैक्षणिक क्रांती घडवली. त्यामुळे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक व विद्यार्थी निर्माण व्हावेत. तसेच जसा शेतकरी शेतीची मशागत करतो व मग चांगलं पीक येतं, तसंच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची मशागत करावी व चांगला समाज, विद्यार्थ्यांचे भवितव्य व पर्यायाने देश घडवावा, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जगदीशब्द फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख, पत्रकार श्रीरंग गायकवाड, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ विजय कुरले, साहित्यिक नारायण सुमंत, व्याख्याते जगदीश ओहोळ, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संकल्प गायकवाड या दुसरीतील चिमुकल्या मुलाने "मी महात्मा फुले बोलतोय" हा प्रगोय सादर केला. त्याला सर्वांनी दाद दिली.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील सर्व जिल्ह्यातून पुरस्कारार्थी निवडण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, आरोग्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags:    

Similar News