Oscar Nomination : भारताच्या 'राईटींग विथ फायर' ला ऑस्कर नामांकन

जगभरातील चित्रपट क्षेत्रासाठीचा सर्वोत्कृष्ट असलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतीय माहितीपट असलेल्या राईटींग विथ फायरचे नॉमिनेशन झाले आहे.

Update: 2022-02-09 04:53 GMT

जगभरातील प्रेक्षकांचे ऑस्कर पुरस्काराकडे लक्ष लागले आहे. त्यातच 94 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी विविध देशातील चित्रपट, माहितीपच आणि लघूपटांचे नामांकण करण्यात आले. त्यामध्ये भारतीय दलित महिलांनी चालवलेले एकमेव न्यूज पोर्टल असलेल्या खबर ए लहरियावर आधारीत असलेल्या राईटींग विथ फायर या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट या कॅटेगरीतून नामांकण मिळाले आहे.


 



लवकरच 94 वे ऑस्कर पुरस्कार 2022 चा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यापूर्वी ऑस्कर पुरस्कारांच्या अकॅडमी ट्विटर हँडल वरून नामांकन जाहीर केली जातात. अशातच एलिस रॉस लेस्ली जॉर्डन यांनी मंगळवारी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स च्या ट्विटर हँडल वरून माहितीपटांच्या नामांकनाची घोषणा केली. या माहितीपटाच्या यादीत रायटिंग विथ फायर या माहितीपटाचा देखील समावेश आहे.

रिंटू थॉमस आणि सुष्मीत घोष यांनी रायटिंग विथ फायर या माहितीपटाचं दिग्दर्शन केलंय. रायटिंग विथ फायर या माहितीपटात खबर लहरियाच्या उदयाची गोष्ट सांगितली आहे. खबर लहरिया हे भारतातील एक वृत्तपत्र तसंच डिजिटल मीडिया पोर्टल आहे. दलित महिलांनी चालवलेलं भारतातलं हे एकमेव मीडिया पोर्टल आणि वृत्तपत्र आहे. या माहितीपटात दलित महिलांवर भाष्य करण्यात आले आहे. 27 मार्च 2022 ला ऑस्कर विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

Tags:    

Similar News