मोठी बातमी : भारतात कोरोनावरील लस या तारखेपर्यंत येणार

Update: 2020-07-03 03:44 GMT

कोरोना विरोधातल्या लढ्यात संपूर्ण जग ज्या बातमीची वाट पाहत आहे ती बातमी अखेर भारताने संपूर्ण जगाला दिलेली आहे. कोरोनावरील लस येत्या 15 ऑगस्टपर्यंत तयार करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी तातडीने मानवी चाचणीची तयारी पूर्ण करावी आणि सात जुलै पासून या चाचण्यांना सुरुवात करावी, असं पत्र ICMRचे प्रमुख डॉक्टर बलराम भार्गव यांनी सर्व विभागांना पाठवलेले.

येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ही लस उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व विभागांना भार्गव यांनी दिले आहेत.

हे ही वाचा..

भारत बायोटेक, आयसीएमआर आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या तिन्ही संस्था मिळून सध्या कोरोनावरील लसीवर एकत्रितपणे काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या लसीच्या प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर मानवी चाचणीला परवानगी देण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डॉक्टर बलराम भार्गव यांनी भारत बायोटेक आणि इतर संबंधित विभागांच्या सर्व प्रमुखांना 15 ऑगस्टच्या आत ही लस तयार करण्यासंदर्भात पत्र पाठवलेले आहे.

Similar News