अमेरिकेत कोरोनावरील 4 लसींच्या मानवी चाचणीला परवानगी

26

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आता कोरोनावरील 4 लसींना मान्यता देण्यात आली आहे आणि त्यांच्या मानवी चाचणीसाठी 4 उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध विभागाचे प्रमुख स्टीफन हान यांनी दिली आहे.

त्याचबरोबर आणखी 6 लसींवर काम सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. पण ही लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकणार आहे.

दरम्यान अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ अँथनी फॉसी यांनी मात्र अमेरिकेला लस बवनण्यात यश येईल याची खात्री देता येणार नाही असे म्हटले आहे. या लसींचे परिणाम आणि त्यांची माहिती या वर्षांच्या अखेरपर्यंत कळू शकतील असंही फॉसी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा..

लॉकडाऊन वाढलं आणि गोंधळही

#कोरोनाशी_लढा- जागतिक पातळीवर या यादीत भारत तळाला…

दरम्यान अमेरिकेत लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लोक आरोग्याचे नियम पाळत नसल्याचे दिसते आहे. “यापुढे लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासह सुरक्षेचे नियम पाळले नाहीत तर दरदिवसाला 1 लाख रुग्ण अमेरिकेत आढळू शकतात” अशी भीती अँथनी फॉसी यांनी व्यक्त केली आहे. सध्या अमेरिकेत दरदिवसाला सरासरी 40 हजार रुग्ण आढळत आहेत.

Comments