Top
Home > News Update > #कोरोनाशी_लढा- जागतिक पातळीवर या यादीत भारत तळाला...

#कोरोनाशी_लढा- जागतिक पातळीवर या यादीत भारत तळाला...

#कोरोनाशी_लढा- जागतिक पातळीवर या यादीत भारत तळाला...
X

देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज चौदा ते पंधरा हजारांच्या दरम्यान वाढत चालली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून दररोज 300 च्यावर रुग्णांच्या मृत्यू़ंची नोंद होत आहे. पण जागतिक पातळीवर विचार केला तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येचे प्रमाण भारतात खूप कमी आहे.

दर लाख लोकसंख्येमागे भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सध्या 56.38 टक्के एवढे झाले आहे. गेल्या 24 तासात भारतात 10 हजार 994 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

ब्रिटनमध्ये दर लाख लोकसंख्येमागे 63.13 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर स्पेनमध्ये हे प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे 60.60 टक्के आहे. इटलीमध्ये हे प्रमाण 57 .19 टक्के आहे. तर जगात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेलेल्या अमेरिकेमध्ये दर लाख लोकसंख्येमागे मृत्यू झालेल्या लोकांचे प्रमाण 37. 30 टक्के एवढे आहे.

Updated : 24 Jun 2020 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top