लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान

Update: 2021-04-01 12:40 GMT

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स आणि आरोग्य यंत्रणेबरोबच सर्व यंत्रणेशी बोलणी सुरु असून मुख्यमंत्रीच याबाबत अंतिम निर्णय घेतील,0 अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. आम्ही लगेच लॉकडाऊनवर करणार नाही, मात्र सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याच देखील टोपे यांनी म्हटलंय. लॉकडाऊनचे चांगले आणि वाईट परीणाम होत असले तरी जीव गेल्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. मात्र सध्या निर्बंध कडक करण्यावर राज्यसरकारचा भर असून लॉकडाऊन लावण्यासाठी तयारीही करून ठेवावीच लागते, असे म्हणत सरकारने लॉकडाऊनची तयारीही सुरु केल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावं, सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मास्क वापरुन सोशल डिस्टनसींग पाळलं तर कोरोना होणार नाही, असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यातील नागरीकांनी सोशल डिस्टसिंग पाळल्यास लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करणं गरजेचं असून मुंबईत टेस्टिंग, ट्रेसिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं असून तिथे एक दोन हॉस्पिटलचा अपवाद वगळता बेडची कमतरता नसल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी वन बूथ टेन युथप्रमाणे तरुणांना विश्वासात घेऊन ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करून घ्यावे असे आवाहनदेखील टोपे यांनी केले आहे.

Tags:    

Similar News