RTI: हरियाणा सरकारने खरेदी केलं 2 कोटी 72 लाख रुपयाचं कोरोनिल, ठीक होणाऱ्यांची माहितीच सरकारकडे नाही...

Update: 2021-08-10 13:56 GMT

हरियाणा सरकार ने 2021 मध्ये बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मेसी मधून 2 कोटी 72 लाख 50 हजार रुपयांच्या 1 लाख कोरोनिल कीट खरेदी केल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भाक माहिती राज्य मंत्री अनिज विज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली होती. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका आरटीआय च्या माध्यमातून समोर आली आहे. ती म्हणजे या कोरोनिल कीट मुळे ठीक होणाऱ्या रुग्णांची नेमकी किती संख्या आहे? याची काही माहितीच राज्य सरकारकडे नसल्याचं समोर आलं आहे. याचा डाटा आणि रेकॉर्ड सरकारकडे नसल्याचं सरकारने म्हटलं आहे.

पानीपतच्या आरटीआई एक्टिविस्ट पीपी कपूर यांनी 28 मे 2021 ला हरियाणाच्या आरोग्य विभागाने आरटीआय अंतर्गत ही माहिती मागवली होती. 3 ऑगस्ट 2021 ला मिळालेल्या उत्तरानुसार राज्याने खरेदी केलेल्या कोरोनिल किटपासून ठीक होणाऱ्या रुग्णांची माहिती आयुष विभागाकडे नाही. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारदरम्यान कोरोनिल किटचा उपयोग, टेस्ट आणि तपासणी या संबंधित रिपोर्ट ही या विभागाकडे उपलब्ध नाही.

आरटीआईच्या उत्तरात मिळालेल्या कागदपत्रात असं लिहिलं आहे की, कोरोनिल किटची खरेदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावानंतर केली गेली आहे. हरियाणा मेडिकल सर्विसेस कॉरपोरेशन लिमिटेड (एचएमएससीएल) च्या पत्रानुसार दिव्य फार्मेसी कडून 50 टक्के सूटसह ही खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला गेला होता.

यानंतर आयुष विभागाने एक लाख कोरोनिल किट्स योग गुरु रामदेवच्या दिव्य फार्मेसीमधून खरेदी केल्याचा रिपोर्ट बनवला गेला. राज्याच्या वित्त विभागाच्या सांगण्यानंतर ही खरेदी करण्यात आली.

यासाठी सरकारने कोरोना रिलीफ फंडातून 2 कोटी 72 लाख 50 हजार रुपये दिले होते. दिव्य फार्मेसी ने 545 रुपये मध्ये विकणारी प्रत्येकी एका कीट वर राज्य सरकारला 50 टक्के सवलत दिली होती.

Tags:    

Similar News