दिल्ली आंदोलन : सरकार आणि शेतकऱ्यांच्य़ा बैठकीतून सकारात्मक संकेत

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमधून थोडी सकारात्मक बामती आली आहे.

Update: 2020-12-30 13:09 GMT

दिल्लीत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या सहाव्या फेरीमधून एक सकारात्मक बातमी येत आहे. या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवल्याची माहिती मिळतेय.

यामध्ये दिल्लीतील प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येत असलेल्या कायद्यांमधून शेतकऱ्यांना वगळण्याची मागणी मान्य करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे तर प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकात दुरूस्ती करण्यासंदर्भात किंवा रद्द करण्यासंदर्भात सरकारने तयारी दाखवली आहे.

तर हमीभाव कायद्यासंदर्भात सरकारने समिती स्थापन करण्याची तयारी दाखवली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुददा आहे तो ३ कृषी कायद्यांचा...हे कायदे रद्द करण्यास सरकार तयारी नाहीये. पण कायद्यांमध्ये काय सुधारणा केली पाहिजे त्याचा प्रस्ताव द्या अशीही भूमिका सरकारने मांडल्याची माहिती मिळते आहे.

Tags:    

Similar News