दिलासादायक – अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली

Update: 2020-04-07 00:22 GMT

कोरोनाच्या जागतिक संकटाने आतापर्यंत संपूर्ण जगात ६७ हजार ८४१ बळी घेतल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. तर कोरोनाबाधीतांची संख्या १२ लाख १४ हजार ९७३वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात जगभरात 77 हजार ४४५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर ४ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सध्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ लाख ५२ हजार ६०० वर पोहोचली आहे. तर युरोपमध्ये कोरोनाचे ६ लाख ५५ हजार ३३९ रुग्ण आढळले आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीननुसार ब्रिटन आणि युरोपातील काही देश वगळले तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधीत नवीन रुग्णांचा आकडा दर दिवसाला कमी होत आहे.

पण भारतात दरदिवसाला रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. पण इतर देशांच्या तुलनेत सध्या तरी भारतात कोरोनाबाधीतांची संख्या कमी आहे.

Similar News