जगभरात एका दिवसात कोरोनाचे १ लाख ४२ हजार नवे रुग्ण

Update: 2020-06-14 02:42 GMT

संपूर्ण जगातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ७५ लाखांवर गेली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तर २४ तासात जगभरात कोरोनाचे १ लाख ४२ हजार ६७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत ५ हजार ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषाणूने घेतलेल्या बळींची एकूण संख्या ४ लाख २३ हजार ३४९ झाली आहे.

हे ही वाचा..

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ११०

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० हजारांपर्यंत

कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या १९ मागण्या

तर दुसरीकडे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेत आतापर्यंत १ लाख १५ हजार ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत अमेरिकेनंतर ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटन या देशांचे नाव आहे.

भारतातील मृत्यूचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. पण रशियामध्ये भारतापेक्षा सुमारे २ लाख रुग्ण जास्त असले तरी तिथल्या कोरोना बळींची संख्या भारतापेक्षा कमी आहे.

Similar News