गणेशोत्सव काळात कोकण भागात अखंडित वीजपुरवठा करा: डॉ. नितीन राऊत

Update: 2020-08-12 02:54 GMT

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज महावितरणच्या फोर्ट स्थित कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोकण विभागात गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी येथेही वीज कपात न करता चोवीस तास वीज पुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.

हे ही वाचा...

अमेरिकेत उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत भारतीय वंशाच्या ‘कमला’

नगर जिल्ह्यातील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पाडून दाखवा – सामना

याचबरोबर, रोहा येथे २२ केव्ही स्वीचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात २८०० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भोगोलिक दृष्ट्या मोठया शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यासंदर्भातही कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश मंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.

Similar News