Home > News Update > सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पाडून दाखवा – सामना

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पाडून दाखवा – सामना

सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पाडून दाखवा – सामना
X

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी उगारलेली बंडाची तलवार म्यान केली आहे. त्यामुळे भाजपचे ऑपरेशन कमळ इथे फसले आहे. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. या अग्रलेखात काय टीका करण्यात आली आहे ते पाहूया...

राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. सत्ता व दबावाचे सर्व मार्ग अवलंबून अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या भूमीवर सरकार पाडणाऱ्यांना मात दिली. सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जे घडवता आले ते भाजपला राजस्थानच्या युद्धभूमीवर करता आले नाही.

हे ही वाचा...

आरोग्य विभागात तात्पुरत्या भरतीचा सरकारचा निर्णय

संजय दत्तला कॅन्सर…

“ऐ मौत तूने मुझे ज़मीदार कर दिया”, राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन

गेहलोत यांच्या तुलनेत पायलट हे कमालीचे कच्चे खेळाडू निघाले. म्हणजे महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी उरकूनही तोच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला. पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱया नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच

Updated : 12 Aug 2020 2:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top