western Maharashtra as heavy rains: कोल्हापुरमध्ये पुराचा धोका, लोकांना सुरक्षित स्थळी हलवले...

Update: 2020-08-07 16:14 GMT

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ सुरु आहे. त्यातच काल रात्रीपासून पावसाची सुद्धा संततधार सुरूच आहे. एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला महापुराची भीती यामुळे नागरिकांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली. या पूर परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने लक्ष देऊन आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी व प्रशासन हे लोकांना योग्य त्या सतर्कतेच्या सूचना देत आहेत. कालपर्यंत घेतलेल्या परिस्थितीच्या अनुसार धरणाचे पाणी न मिसळताच या वर्षी पंचगंगा नदीला पूर आलेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या बंधाऱ्याची पाणी पातळी 44 फुट 10 इंचावर गेली आहे. पाणी बंधारा पातळी 43 वर गेल्यानंतर धोक्याची पातळी वाढते. काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, जिल्ह्यात पुराचे पाणी वाढ झाल्यामुळे 9 राज्य मार्ग 28 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 37 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत 23 गावातील सतराशे पन्नास कुटुंबातील साडेचार हजार पेक्षा अधिक व्यक्तींचे जनावरांसह स्थलांतर करण्यात आलेलं आहे.

हे ही वाचा...

Air India Plane Crash: केरळला येणाऱ्या विमानाला मोठा अपघात, विमानाचे दोन तुकडे

कोरोनावरील लसीची किंमत ठरली !

ये तो सिर्फ झांकी हैं…

रात्री उशिरा शहरातील शाहूपुरी मधील कुंभार गल्ली, वीनस कॉर्नर, पेंढारकर कलादालन अशा वेगवेगळ्या ठिकाणी पुराचं पाणी शिरलं आहे. सुतार मळा येथे राहणारे रहिवाशी यांना चित्रदुर्ग मठात हलवण्यात आले आहे. महानगर पालिका हद्दीत पुराने बाधित होणाऱ्या जवळपास 18 प्रभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे.

या दृष्टिकोनातून आयुक्तांनी त्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी योग्य ते निर्देश दिले आहेत. तसेच निवारा गृहात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी आरोग्य सुविधा आणि आरोग्य किट याचंही वाटप करावं. अशा प्रकारच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेले आहेत. शहरातील कुंभार गल्ली, व्हीनस टॉकीज त्याचबरोबर सुतार मळा या ठिकाणच्या वीस कुटुंबांना स्थलांतर केलेले आहे. प्रशासनाकडून शुक्रवार व रविवारी सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिलेला आहे.

Similar News