Home > News Update > Air India Plane Crash: केरळला येणाऱ्या विमानाला मोठा अपघात, विमानाचे दोन तुकडे

Air India Plane Crash: केरळला येणाऱ्या विमानाला मोठा अपघात, विमानाचे दोन तुकडे

Air India Plane Crash: केरळला येणाऱ्या विमानाला मोठा अपघात,  विमानाचे दोन तुकडे
X

केरळ मध्ये कोझिकोड विमानतळावर Air India च्या IX 1344 या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या विमानात 170 प्रवासी होते. अपघाताचे कारण अद्यापर्यंत समोर आले नसलं तरी हे विमान रनवे वरुन घसरल्याची प्राथमिक माहिती येत आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. 32 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. संध्याकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली.

'वंदे भारत मिशन'च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.

हे ही वाचा

कोरोनावरील लसीची किंमत ठरली !

“भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने”

सध्या हाती आलेल्या बातमीनुसार, वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. 32 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Updated : 7 Aug 2020 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top