सामाजिक संदेश देत क्रिकेट बिगिन अगेन !

Update: 2020-07-09 05:26 GMT

कोरोनामुळे ठप्प असलेल्या क्रिकेटला तब्बल 117 दिवसांनंतर पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. साउदम्प्टनमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांनविना खेळली जाणारी ही पहिलीच मॅच ठरलेली आहे.

पहिल्या दिवसाच्या खेळात पावसामुळे व्यत्यय आल्याने फक्त 17.4 ओव्हर्सचा खेळ पहिल्या दिवशी होऊ शकला. यामध्ये पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडने एक गडी गमावत 35 धावा केल्या आहेत. पण या कसोटीचा पहिला दिवस चर्चेत राहिला तो एका वेगळ्या कारणाने....ही कसोटी सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांच्या सर्व क्रिकेटपटूंनी आणि कसोटीशी संबंधित सर्व लोकांनी गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर या चळवळीला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी हातात काळे ग्लोव्ह्ज घालून ते उंचावले.

हे ही वाचा..

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये पुन्हा एकदा वर्णद्वेषाविरोधात मोठी चळवळ उभी राहिलेली आहे. त्याचबरोबर कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही बाजूंच्या क्रिकेटपटूंनी अर्धवर्तुळाकार उभे राहात कोरोनामुळे जीव गमावलेल्या जगभरातील लोकांना श्रद्धांजली वाहिली.

Similar News