ट्रम्प सरकारच्या एका निर्णयाला शैक्षणिक संस्थांचे कोर्टात आव्हान

Harward and MIT challenges trump government’s decision for foreign students
Courtesy: Social Media

कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना आता त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशाससानं घेतला आहे.

यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पण आता हार्वर्ड विद्यापीठ आणि एमआयटीने कोर्टात धाव घेत ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.

हा निर्णय बेकायदा आणि निर्दयी आहे, पण आम्ही परदेशी विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार आहोत, अशी भूमिका या शिक्षण संस्थांनी घेतली आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावर निर्बंध आणल्याने लाखो परदेशी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर मोठी स्वप्न पाहत शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे तिथून काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील विद्यापीठांना 15 जुलैपर्यंतची मुदत दिली असून त्याधी विद्यापीठांना ऑनलाईन कोर्स सुरू करणार की प्रत्यक्ष शिक्षणाला सुरूवात करणार याचा निर्णय घ्यायचा आहे असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here