दीड दिवसाच्या बाप्पानंतर गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

दीड दिवसाच्या बाप्पानंतर गौरी-गणपतीला कल्याण येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान कोळी बांधवांच्या मदतीने गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

Update: 2021-09-14 12:55 GMT

कल्याण : सोनपावलांनी घरी आलेल्या गौराईची पाच दिवस पूजाअर्चा करण्यात आली. या पाच दिवसात महिलांनी फुगडी घालून फेर धरला. घागरी फुंकल्या आणि सूपही उडवले. सासू-सूनांनी गौराई समोर गाणी म्हणत मनमोकळंही केलं. पाच दिवस चालेल्या या पारंपारिक पूजाअर्चेनंतर आज माहेरवाशीण गौराईला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज दुपार पासूनच कल्याणच्या गणेश घाटावर या गौराईंना श्रद्धापूर्वक निरोप देण्यात आला.

दीड दिवसाच्या बाप्पाच्यानंतर आज 5 दिवसाच्या गौरींसोबत गणपतीचे देखील विसर्जन होत असून त्यासाठी महानगरपालिकेने दुपारनंतर विसर्जन ठिकाणी भक्तगण येणार असल्यामुळे ठिकाणी बॅरेकेटिंग करत जागोजागी सूचना फलक लावत कोळी बांधवांच्या मदतीने गौरी गणपतीचे विसर्जन केले.

Similar News