नांदेड जिल्ह्याला पावसाचा तडाखा, 2 महिला वाहून गेल्या

Update: 2021-08-31 05:24 GMT


नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव (नसरत) येथे सोमवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. बैलगाडीत घराकडे निघालेल्या पाच जणांपैकी दोन महिला सावरगाव येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अन्य तीन जण झाडाला पकडून राहिल्यामुळे बचावले आहेत.




सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. पावसामुळे पाणी वाढल्यामुळे ते आपल्या बैलगाडीसह घराकडे येथ असतांना रस्त्यावर नदी लागते. नदी ओलांडून येतांना अचानक नदीला पुराच्या पाण्याचा लोट आला. या लाटेत बैलगाडी उलटून वाहून गेली. गाडीमध्ये अमोल दगडगावे, भाऊ विवेक दगडगावे, पत्नी शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पाच जण बसले होते. त्यातील मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, (वय ५२) यांचा पार्थिव हुलेवाडी येथील पुलालगत आढळले. तर पार्वतीबाई संभाजी दगडगावे (वय ४५) यांचे पार्थिव पालम तालुक्यातील पेंडू येथे आढळले. या दोन्ही सख्या जावा होत्या.

इतर तीन जण यात अमोल दगडगावे, विवेक दगडगावे, शिवमाला दगडगावे, हे मात्र झाडाच्या फांदीला धरुन आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले.

Tags:    

Similar News