...तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती: देवेंद्र फडणवीस

Update: 2020-05-27 14:32 GMT

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कालच्या (मंगळवार) पत्रकार परिषदेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार ने राज्यसरकारला किती रुपये दिले? किती कोटी रुपयांची मदत केली याचे आकडे सांगितले होते. तसंच राज्यसरकार कोरोना ची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं असल्याची टीका केली होती.

त्यानंतर आज कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आकडे खोटे असल्याचा दावा केला आहे.

तसंच 'राज्य सरकार सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी लढत आहे. अशावेळी माझं देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगणं आहे की, ही काही सरकार पाडण्याची वेळ नाही. ही वेळ सरकारच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे.'

अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. मी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी तासन् तास बैठका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढ्या बैठका करोनाविरोधातली लढाई लढण्यासाठी घेतल्या असत्या तर महाराष्ट्राची आज ही अवस्था झाली नसती. अशी टीका या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. पाहा काय म्हटलंय फडणवीस यांनी?

Full View

Similar News