काश्मिरी व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, व्हायरल व्हिडिओने खळबळ

Update: 2022-03-23 09:55 GMT

Photo courtesy : social media

देशात सध्या The Kashmir Files सिनेमावरुन एक नवीन वाद सुरू असताना आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये एका काश्मीरी व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कोणत्याही नागरिकाला हॉटेलमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असे पोलिसांनी सांगितल्याचे त्या हॉटेलमधील महिला कर्मचारी सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे. आरजे सयमा हिने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना टॅग केले आहे आणि "आता हे सुरू झाले आहे @vivekagnihotri अशा आशयाची पोस्ट केली आहे.

काश्मीर फाईल्स सिनेमाच्या माधम्यातून हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा आरोप होतो आहे. तसेच मुस्लिमांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा घटना वाढण्याचा इशाराही काहीजण देत होते. आता काश्मीरमधील मुस्लिम व्यक्तीला अशाप्रकारे वागणूक मिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधारकार्ड आणि पासपोर्ट जम्मू-काश्मीरचे असल्याने तुम्हाला हॉटेलमध्ये प्रवेश देता येणार नाही, असे कारण या व्यक्तीला देण्यात आले आहे.

हा मूळ व्हिडिओ ट्विट केला आहे, तो जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेचा नेता नासीर खुहेमी याने....अधिकृत ओळखपत्र आणि कागदपत्र असूनही केवळ काश्मीरी असल्याने प्रवेश नाकारला गेला, काश्मीरि असणे हा गुन्हा आहे का, असा सवाल त्याने ट्विटवर उपस्थित केला आहे.

Tags:    

Similar News