'पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता... '; फडणवीसांच्या मराठवाडा दौऱ्यावर सामनातून टीका

Update: 2021-10-04 02:02 GMT

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला , या दौऱ्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे, सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, 'मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता का?,' असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस काल (रविवारी) नुकसानग्रस्त नांदेडच्या दौऱ्यावर होते. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेचा नेता गळाला लावला.तीन वेळा आमदार राहिलेल्या सुभाष साबणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप प्रवेशाची घोषणा करत 'शिवसेनेवर राग नाही, पण मंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून सेनेला जय महाराष्ट्र करत आहे' असं म्हटलं. आणि पुढच्या काही तासांतच त्यांना पोटनिवडणुकीचं तिकीटही जाहीर झालं.त्यावरून शिवसेनेने पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक 'मुखवटा' होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा 'चेहरा' होता असा घणाघात केला.

दरम्यान राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी अतिवृष्टीमुळे झालेली परिस्थिती पाहिली , आता त्यांनी याबाबत त्यांना जे वाटते ते सरकारला सांगायला हवे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहेच. हा एक प्रकारे ओला दुष्काळ आहे, या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली ती योग्यच आहे. महाराष्ट्रातील पुराच्या विळख्यात सापडलेला शेतकरी हा राजकारणाचा विषय नाही.

Tags:    

Similar News