भारतासाठी धोक्याची घंटा! थंड हवामान असलेल्या जम्मू मध्ये आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

Update: 2020-03-07 09:15 GMT

चीन मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरस ने जगाला हादरवून टाकले आहे. जगातील अनेक देशात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. भारतात देखील कोरोना व्हायरसने आपले डोके वर काढले आहे.

ANI या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू मध्ये कोरोनाचे 2 रूग्ण आढळले आहेत. त्यांच्या तपासाचे नमुने सकारात्मक असल्याची शक्यता वाढल्याने जम्मू प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र, जम्मू मध्ये हवामान थंड असल्यानं या ठिकाणी कोरोनोची वाढ होण्याची शक्य़ता वाढते. कारण कोरोना हा थंड हवामानात जिवंत राहतो.

प्रतिबंमधात्मक उपाय म्हणून दोन्ही रूग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जम्मू कश्मीरचे प्रमुख सचिव रोहीत खंसाल यांनी खबरदारीचा उपाय म्हणून येथील प्राथमिक शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी घोषीत केली आहे. तसंच सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा असं आवाहन केलं आहे.त्याचबरोबर कोरोनाचा रूग्ण आढळल्यास त्याचा परीणाम जम्मू येथील पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतात कोरोना मुळे एकही व्यक्ती दगावला नाही. ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी देशात कोरोनाचे 30 पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. ही चिंतेची बाब आहे. जगभरात कोरोनाचे तब्बल 3422 बळी गेले असून हा आकडा वाढण्याची भीती आहे.

Similar News