दलित साधुंचं उष्टं खाल्ल्याने जातीभेद संपणार का?

ऐन निवडणूकीच्या काळात विविध पक्षांच्या नेत्यांचे दलित कुटूंबियांसोबत वेळ घालवल्याचे, दलितांच्या घरी जेवण केल्याचे फोटो व्हायरल होत असतात. असाच आणखी एक प्रकार कर्नाटकमधील चामरपेट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदाराने केला आहे. त्यामुळे दलित साधुंचं उष्टं खाल्ल्याने जातीभेद संपणार का? अशी चर्चा रंगली आहे.

Update: 2022-05-25 14:59 GMT

कर्नाटक राज्यात हिजाब प्रकरणावरून धार्मिक वाद रंगला होता. त्यातच देशात विशिष्ट विचारसरणीकडून जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा कुटील डाव रचला जात असल्याची टीका केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराने दलित साधुच्या तोंडातील घास काढून जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अशा प्रकाराने जातीयवाद संपेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कर्नाटक राज्यातील चामरजपेट या मतदारसंघाचे आमदार जमीर अहमद खान यांनी आंबेडकर जयंती आणि ईद ए मिलनच्या कार्यक्रमात एका दलित साधुला घास भरवला. त्यानंतर तो घास त्य दलित साधूला बाहेर काढायला सांगून आपण खाल्ला. तसेच अशा प्रकारे आपण जातीभेद आणि धर्मभेद संपवण्यासाठी पाऊल टाकत असल्याचे जमीर खान यांनी म्हटले. तसेच जमीर खान यांनी जातीभेद आणि धर्मभेदाचे राजकारण करणाऱ्यांवर यावेळी मोठ्या प्रमाणावर टीका केली. मात्र आमदार जमीर खान यांनी केलेल्या कृतीमुळे देशातील जातीभेद संपेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आमदार जमीर अहमद यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत.

Tags:    

Similar News