पुणे पोलिसांचं उलटं-सुलटं ट्वीट, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू

Update: 2023-04-24 03:18 GMT

 Pune पोलिसांची कँपेन चांगलीच गाजतेय. ट्वीटर वर या कँपेनची चर्चा आहे. Wrong Side Driving आणि पदपथांवर गाड्या चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. मात्र या कारवाई सोबतच पुणे पोलिसांचं उलटं-सुलटं ट्वीट चर्चेचा विषय बनलंय. पुणे पोलिसांनी उलट दिशेने वाहनं चालवणाऱ्या तसंच पदपथांवर गाड्या चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट करून माहितीही दिली आहे.

संपूर्ण पुणे शहरात ही मोहीम लागू करण्यात आली असून नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं पुणे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. या कारवाईचं पुण्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे, मात्र अनेकांनी वाढत्या वाहतूक समस्यांबाबत तक्रारीचा पाढा ही वाचला आहे. खराब रस्ते, बेशिस्ती यामुळे पुण्याचं नाव बदनाम होत असल्याच्या प्रतिक्रिया ही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.


पुणे पोलिसांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रीया देतांना रणजित रहांगे यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कदाचित मी बघण्यात चुकत असेल. पण फोटोत दिसण्यावरून जे वाटतं ते... हे पण आता पुणे शहर पोलिसांनीच ट्वीट करायचं का? असा सवाल विचारला आहे. 

या फोटोत ट्राफिक पोलिसांनी गाडी थांबवली आहे. त्या गाडीचा नंबर प्लेट आणि त्या व्यक्तींचे चेहरे ब्लर करून फोटो काढण्यात आला आहे. त्यामध्ये गाडी चालक डावा हात कमरेपाशी घेऊन पोलिसाच्या हाती काहीतरी देत असल्यासारखं दिसत आहे. त्यावरून रणजित रहांगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 


Tags:    

Similar News