नीट बोला... चंद्रकांत पाटलांचा गोपिचंद पडळकरांना सल्ला

Update: 2021-02-14 13:08 GMT

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या गोपिचंद पडळकर यांच्यावर विरोधी पक्षाने तोंडसुख घेतलं आहे. मात्र, पडळकर यांच्या बोलण्याशी पक्ष म्हणून भाजपची संमती आहे का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज पत्रकारांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत केला होता.

Full View

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आम्ही गोपिचंद पडळकरांना व्यक्तीगतरित्याही सांगू, आणि तुम्ही विचारलं म्हणून जाहीरपणे सांगू तेच बोलायचं असतं. नीट बोलायचं असतं... असा सल्ला दिला आहे.

काय म्हटलंय होतं गोपिचंद पडळकर यांनी..Chandrakant patil advise to Gopichand Padalkar on Sharad Pawar Crisis issue.

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण करणं ही अपमानास्पद बाब असून आहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी त्यांचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळेच आम्ही युवा कार्यकर्त्यांच्या सोबत जेजुरीमधील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गडावर आलोय. असं म्हणत शरद पवारांवर जोरदार टीका केली होती.

Tags:    

Similar News