Cabinet Decision: 'हे' आहेत मंत्रीमंडळ बैठकीचे 5 महत्त्वाचे निर्णय

Update: 2021-05-05 13:12 GMT

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयासह मह्त्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

काय आहे मंत्रीमंडळाचे महत्त्वाचे निर्णय?

शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू.(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग(

सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देणार (सार्वजनिक आरोग्य विभाग)

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन विभागास हस्तांतरीत करण्याचा निर्णय. (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग )

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विलीनीकरण ( नगरविकास विभाग)

कोविड परिस्थितीमुळे सहकारी संस्थांचे सदस्य मूलभूत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून अधिनियमात सुधारणा

Tags:    

Similar News