मोदींच्या नोटबंदीची झळ व्यवसायिकांना आजही जाणवते...

Update: 2020-11-08 15:00 GMT

औरंगाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताच्या चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ अजूनही सामान्य लोकांना बसत आहे.

नोटबंदीचा निर्णय 'खोदा पहाड निकला चुहा' या म्हणीप्रमाणे ठरला.नोटबंदीच्या सार्‍या खटाटोपातून साध्य काय झाले या प्रश्नाची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत. मात्र मोदी सरकारच्या या एका निर्णयामुळे देशातील लाखो छोटी-मोठी व्यवसायिक आज रस्त्यावर आली आहेत.


औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यापीठ परिसरात गेल्या 15 वर्षांपासून पुस्तकाचा व्यवसाय करणाऱ्या सुधाकर देवकर यांनाही या नोटबंदीचा फटका बसल्याने दुकान बंद करण्याची वेळ आली

देवकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठ रोडवर आपली पुस्तकाची दुकान चालवतात. औरंगाबादला चळवळीचा इतिहास असून विद्यापीठ परिसर त्याचे केंद्र समजले जाते. अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी सुद्धा येतात. त्यामुळे महापुरुषांचे पुस्तकांचा दुकान देवकर यांनी 15 वर्षांपूर्वी सुरू केले होते. त्यांच्या या पुस्तकं विक्रीला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला

मात्र देशात नोटबंदी झाली आणि तेव्हापासून जो व्यवसाय मंदावला तो आजही ही कायम आहे. लोकांचे रोजगार गेले आणि त्याचा परिणाम पुस्तक विक्रीवर सुद्धा झाला. आधी वाचक वर्ग मोठा होता ,पण आता तो वाचक राहिला नसल्याचे देवकर सांगतात.


त्यातच मोबाईल क्रांतीमुळे तरुण वर्गाने पुस्तक वाचणे बंद केले. सर्व काही इंटरनेटवर मिळून जाते. हवं तेवढं लगेच गुगलवर मिळत असल्याने पुस्तक वाचण्याची गरजच काय असा समज तरुण पिढीचा झाला झाल्याचं देवकर म्हणाले.




हेच काय कमी होते, त्यात आता कोरोनाच्या संकटाने सर्वच काही संपून टाकल्याचं सुद्धा देवकर म्हणतात.आता तर पुस्तक विकतच नाही. त्यात महापुरुषांचे पुस्तक तर बिलकूलच कुणी विकत घेत नाही. त्यामुळे संकटात सापडल्याचही ते म्हणाले.

नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाली. मात्र तरीही देशातील व्यापारी यातून आजही सावरू शकला नाही. त्यामुळे नोटबंदीमुळे देशाला नवीन दिशा मिळेल हे जनतेपुढे उभे करण्यात आलेले आशादायी चित्र अत्यंत भ्रामक आणि फसवे असल्याचे सिद्ध झाले आहे.

Full View

Similar News