बुधवार पेठेतील वेश्यांना कोरोना, डॉक्टरांनी औषधं देऊन पाठवलं घरी

Update: 2020-07-27 03:19 GMT

गेल्या काही दिवसांपासून कोरोना मुक्त झालेल्या पुण्यातील बुधवार पेठेत आता हळूहळू वेश्या व्यवसायाला (Sex Worker) सुरुवात झाली आहे. त्यातच आता बुधवार पेठेत कोरोनाचे (Sex Worker Area) 5 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 3 फेरीवाल्यांचा समावेश आहे. तर इतर दोन वेश्या (Two Sex Worker) व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. अशी माहिती कायाकल्प संस्थेच्या सारिका लष्करे यांनी केली आहे.

यातील एका व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं आहे. तर 4 व्यक्तींना पॉझिटीव्ह रिपोर्ट येऊन देखील औषधं देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 4 ही व्यक्तींच्या घरात माणसं आहेत. त्यातच बुधवार पेठेतील वस्तीची रचना पाहिली असता, अत्यंत चिंचोळी आहे.

त्यामुळं या चार व्यक्तींमुळं घरातील इतर लोकांना आणि आजुबाजूच्या व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा...

‘गाडीचे स्टिअरिंग’ कुणाच्या हाती?

किरण बेदींना कोवीड-19 मंत्रालय? काय आहे सत्य?

राज्यात 24 तासात पुन्हा 9 हजारांच्यावर रुग्ण

“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लागू करा”

विशेष बाब म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या या दोनही महिला सेक्स वर्कर आहेत. या महिलांमुळं इतर लोकांना कोरोना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळं प्रशासनानं तातडीने या महिलांना रुग्णालयात भरती करणं गरजेचं आहे.

मात्र, डॉक्टरांनी रुग्णांना औषधं देऊन घरी क्वारंन्टाईन होण्यास सांगितलं आहे. मात्र, बुधवार पेठेत त्यांची क्वारंटाईनची स्वत:ची अशी व्यवस्था नाही. त्यामुळं त्यांच्या सोबत इतर लोकांना कोरोना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यातच बुधवार पेठेत कोरोनाचे रुग्ण आढळले तर सर्व वेश्या व्यवसाय बंद पडून पुन्हा एकदा या महिलांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावं अशी मागणी कायाकल्प संस्थेच्या सारिका यांनी केली आहे.

या संदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी आम्ही फोनवरुन संपर्क केला असता, त्यांनी फोन घेतला नाही. संपर्क झाल्यानंतर बातमीमध्ये त्यांची प्रतिक्रिया दिली जाईल.

Similar News