Mantralaya Bomb Threat: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन, शोधकार्य सुरु

Update: 2021-05-30 11:18 GMT

एका व्यक्तीने महाराष्ट्राच्या मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्यानं खळबळ उडाली आहे. आज दुपारी पावणे एकच्या सुमारास एक फोन महाराष्ट्राच्या मंत्रालयातील आपत्कालीन कक्षामध्ये फोन आला होता. या फोनवरील व्यक्तीने महाराष्ट्राचं मंत्रालय उडवण्याची धमकी दिली होती.

मंत्रालयाची सुरक्षा वाढवली...

अज्ञात व्यक्तीने दिलेल्या धमकीनंतर मंत्रालयाबाहेरील आणि आतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे

बॉम्बशोधक पथक दाखल...

सदर धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले असून मंत्रालयाची तपासणी केली जात आहे. बॉम्बशोधक पथका सोबत श्वान पथकही दाखल झालं आहे. सुदैवाने आज रविवारचा दिवस असल्यानं मंत्रालयात गर्दी नाही.

कोणी केला फोन?

अद्यापपर्यत शोध पथकाला कोणतीही संदिग्ध वस्तू आढळलेली नाही. त्यातच आलेल्या निनावी फोनमुळे हा फोन नक्की कोणाचा होता? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News