बोगस बियाण्यानंतर आता बोगस पोल्ट्री खाद्याचा सुळसुळाट

शेतीक्षेत्रात बोगसगिरी ची कमतरता नाही. ऐन खरीप हंगामात बोगस बियाण्याचा सुळसुळाट झाल्यानंतर आता थेट पोल्ट्री खाद्याच्या बोगसगिरीचा सुळसुळाट झाला असून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट पशुसंवर्धन मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.;

Update: 2021-06-14 15:56 GMT

गेले काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक शेतकर्यांच्या पोल्ट्रीफिड़ संदर्भात तक्रारी येत आहेत, निकृष्ट दर्जाचे फिड्स मिळाल्याने अनेक पोल्ट्रीफार्म धारकांचे लाखोंचे नुकसान होत आहे, पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी तर झापा या कंपनीविरोधात अनेक पोल्ट्रीफार्म चालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.. झापा सोबतच बारामती अॅग्रो' या कंपनीचे फीड देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आजच एका शेतकऱ्याने व्हिडीओच्या माध्यमातुन समस्या मांडत सांगितले आहे. अनेक शेतकरी लेअर फार्मसाठी पहील्यापासुन या नामवंत फिड्स कंपन्यांचे पशुखाद्य दिर्घकाळापासुन वापरत आहेत फीडचा कधीही प्राब्लेम आलेला नाही. परंतु गेल्या महिन्यात कंपनीच्या फीडमुळे अचानक कोंबड्यानी अंडी देण बंद केलं अस या शेतकर्यांचं मत येत आहे.

या फिड्स मुळे प्रोडक्शन कमी झाले अशीही त्यांची समस्या आहे. या संदर्भात या नामवंत कंपन्यांचे व्यवस्थापन देखील या शेतकर्यांच्या समस्येबाबत दखल घेत नाही व उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. वेळोवेळी दुर्लक्ष केलय. कंपनीला अजुन ही समस्या कशामुळे उद्भवली आहे हे देखील सांगता येत नाहीए, अशा परिस्थितीत शेतकर्यांना पोल्ट्रीफार्म चालवणे त्या कुक्कुटपशुना खाद्य देणे आदी रोजचा खर्च परवडत नाही आणि कंपनी देखील हात झटकत आहे तरी आपण शासनामार्फत या बाबतीत चौकशी करावी. घटलेल्या प्रकाराबाबत पशुसंवर्धन विभागाने देखील कडक पावले उचलावीत व या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना शेतकर्याच झालेले व होत असलेले नुकसान यांची भरपाई त्या शेतकर्यांनी देण्याचे आदेश या कंपन्यांना द्यावेत, जेणेकरून यामुळे या पोल्ट्रीफार्म धारक शेतकर्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी

राज्य प्रवक्ता,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केले आहे.

शेतकऱ्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ..


https://m.facebook.com/story.php?story_fbid=4233797976643259&id=१०००००३९२९६८५१२





 


Similar News