पवारांनी 'येडं पेरलं अन् खुळं उगवलं', गोपिचंद पडळकरांची टीका

Update: 2021-06-03 10:48 GMT

आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी 'येडं पेरलं अन खुळं उगवलं' अशी गत ठाकरे सरकारची झालीये. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडून पडलाय, घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. यांचे अश्रु पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दुखा:ची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय. अशी टीका आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने 'कोरोनामुक्त गाव' ही योजना जाहीर केली आहे. या योजनेविरोधात पडळकर यांनी टीका केली आहे.

काय म्हटलंय पडळकर यांनी...

'सगळं गावच करील तर सरकार काय करील?' हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडलाय. नेहमी प्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्द्शाने ही करोनामुक्तीची स्पर्धा आयोजीत केली आहे.

या योजनेच्या व्यवस्थापनात सर्व २२ निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत आणि ह्या बाप्याने हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापणेसाठी 'निधी' कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे.

खरंतर या पन्नास लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाहीये. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या'भूलथापांच्या मालिकेचा' एक भाग आहे.

अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

Full View

Tags:    

Similar News