भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाविकासआघाडी सरकारकडून संरक्षण - मुनगंटीवार

Update: 2021-09-20 11:41 GMT

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. आज भाजपचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार हे यवतमाळ दौऱ्यावर आले असता त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाविकास आघाडी संरक्षण देत आहे, तर भ्रष्टाचार उकरून काढणाऱ्याला अटक केली जाते. 

सोबतच जर भाजपच्या साखर कारखानदारांचे घोटाळे असतील तर मंत्री म्हणून ते घोटाळे उकरून काढण्याचा अधिकार घटनेने सरकारमधील मंत्र्यांना दिलेला आहे. किरीट सोमय्या यांनी घोटाळे उकरून काढावे किरीट सोमय्या महाविकास आघाडीकडून पगार घेतात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसं झालं तर सोमय्या यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री म्हणून घ्यावे म्हणजे घोटाळे काढण्याचा अधिकार तरी त्यांना प्राप्त होईल. असं मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण तापले आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी भाजपमधील नेत्यांचे देखील भ्रष्टाचार बाहेर काढावेत असे आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना दिले आहे. सोबतच सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे असून ते केवळ महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे.

Tags:    

Similar News