भाजपला मोठा धक्का; उन्मेश पाटलांचा शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश

Update: 2024-04-03 08:43 GMT

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. यादरम्यान उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा करून आज (बुधवार) त्यांनी मातोश्रीवर ठाकरेंकडून शिवबंधन बांधत शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. अशा काळात त्यांनी भाजप सोडून ठाकरे गटात येणे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर शिवसेनेची ताकद वाढली गेली असल्याचंही मानलं जात आहे.

राजकारणापेक्षा स्वाभिमान महत्वाचा :

या पक्षप्रवेशामध्ये उन्मेश पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी मित्र, करण पवार (माजी नगराध्यक्ष, पारोळा) व इतर अन्य कार्यकर्त्यांनीसुध्दा शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी उन्मेश पाटील बोलताना म्हणाले की, माझी लढाई ही आत्मसन्मानासाठी आहे, त्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली आहे. भाजप पक्षाकडून मला योग्य वागणूक मिळत नसल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. मला तिकीट दिलं नाही याबद्दल मी नाराज आहे, असं नाही, असं उन्मेश पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, राजकारणात काम करताना मान सन्मान नको , पद नको, पण त्याचा स्वाभिमान सांभाळला जा नसेल, अवहेलन केली जात असेल तर लाचार होऊन राजकारण करणं योग्य नाही. भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही, अवहेलना होत असल्यानं वेगळी भूमिका घेतली असे उन्मेष पाटील यांनी म्हटलं.

Tags:    

Similar News