लाठीचार्ज करताच भिडे समर्थकांची पळापळ, पोलिसांची लाठी चुकऊन पळताना काही जण जखमी
मनोहर भिडे यांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालणार होते.
मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे, भिडे समर्थकांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. पोलिसांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले पण जमावाने ताठर भूमिका घेतली. पोलिसांनी लाठ्या उगारताच भिडे समर्थक रस्ता मिळेल तिकडे पळू लागले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या गदारोळात पोलिसांचा मार चुकवताना काही कार्यकर्ते पडून जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.