'आश्रम - 3' वेबसिरीजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

Update: 2021-10-25 03:56 GMT

चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्या 'आश्रम- 3'(Ashram-3 Shooting) या वेबसिरीजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला. भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. 'आश्रम-3' या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन तोडफोड केली. दरम्यान चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्यावर शाही फेकली. 'आश्रम-3' वेबसिरीजची शूटिंग अरेरा हिल्स येथील जुन्या कारागृहात सुरू होती. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिथे येत गोंधळ घातला. त्यांनी चित्रीकरण स्थळावरील कामगारांना मारहाण सुरू केली , तसेच व्हॅनिटी व्हॅन सह इतर 5 गाड्यांची तोडफोड केली. या घटनेत प्रोडक्शन टीममधील 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलीस (Bhopal Police) तातडीने घटनास्थळी पोहचले. दरम्यान भोपाळचे DIG इरशाद वली यांनी सांगितले की, घटनेची सखोल चौकशी करून मारहाण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

दरम्यान आश्रम - 3 या वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने वेब सिरीजचे चित्रीकरण चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.

Tags:    

Similar News