दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… घोषणांनी विधिमंडळ गरजले

Update: 2022-12-22 07:55 GMT

घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा आवार दणाणून सोडला.

विधानसभेचे कामकाज लक्षवेधी सूचनांनी सकाळी नऊ वाजता सुरू झाले होते.परंतु कामकाज सुरू होण्यापूर्वी साडेदहा वाजता सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान पवन च्या पायऱ्यांवर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.

विशेष म्हणजे विरोधकांनी भूखंड लिहिलेले श्रीखंडाचे डबे उंचावून धरत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, नाना पटोले, रोहित पवार, अंबादास दानवे, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षांचे बहुतांश आमदार या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. विरोधकांच्या या आंदोलनानंतर थोड्या वेळात भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे आमदार देखील प्रत्युत्तर दाखल झाले संत आणि सावरकरांच्या अपमानाबद्दल महाविकासआघाडी विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली.

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांची पुनरावृत्ती करत आहात शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनरबाजी केली. AU कोण AU कोण असे फलक त्यांनी यावेळी फडकवले.

Tags:    

Similar News