आर्यन खानचा 'बेल की जेल:आज उच्च न्यायालयात निर्णय होणार

आर्यन खान (Aryan Khan) याला बेल मिळणार की जेल याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे

Update: 2021-10-26 04:30 GMT


रोज प्रचंड नाट्यमय घटना आणि घडामोडी होणारी मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्यन खान (Aryan Khan) याला बेल मिळणार की जेल याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे रोड असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याला बेल मिळणार की जेल याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला आज तरी बाहेर पडणार की, त्याला जेलमध्येच राहावं लागणार हे आजच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल.

2 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याच्या वकिलांनी याप्रकरणी तात्काळ हायकोर्टात धाव घेतलेली. या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली होती. मात्र, हायकोर्टाने याप्रकरणाची सुनावणी 26 ऑक्टोबरला घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम देखील वाढला होता.

दरम्यान या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असून प्रभाकर साईल या पंच असलेल्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ जारी झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. दरम्यान सत्र न्यायालयाने चौकशी अधिकारी समीर वानखेडे यांची याचिका देखील फेटाळली असून एनसीपी कडून आता समीर वानखेडे यांची देखील खाते अंतर्गत चौकशी सुरु झाली आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या कडून रोज एनसीबी वर नवे आरोप होत असून आज देखील ते मोठा खुलासा करणार आहेत.

आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत आर्यन खानच्या वकील नेमका काय युक्तीवाद करतात आणि NCB आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करताना हायकोर्टासमोर कोणते मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या या सुनावणीवरच आर्यनचं पुढचं भवितव्य ठरणार आहे.

Tags:    

Similar News