पटोलेंना अटक करा, गडकरी यांचा संताप

मी मोदींना मारू शकतो, मी शिव्याही देऊ शकतो. वक्तव्याप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात गडकरींनी संताप व्यक्त केला.

Update: 2022-01-18 05:30 GMT

 मी मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच अडचणीत आले आहेत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोलेंना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो, मी शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर नाना पटोले मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले. तर भाजपकडूनही त्यांच्यावर तिखट प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या. मात्र त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाना पटोलेंची भुमिका मांडली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, मोदी हा स्थानिक गुंड आहे. त्याला नाना पटोले यांनी म्हटले की, स्थानिकांना त्रास देणाऱ्या मोदीला मी शिव्या देऊ शकतो, वेळ पडली तर त्याला मारू शकतो. मात्र त्यानंतरही भाजपकडून नाना पटोले यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात होती.

नाना पटोलेंच्या विधानानंतर निर्माण झालेल्या वादामुळे अखेर पटोलेंनी एक व्हिडीओ जारी करत स्पष्टीकरण दिले. त्यात त्यांनी म्हटले की, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोदी हा स्थानिक गुंड आहे. तो स्थानिकांना त्रास देत होता. त्याची तक्रार गावकऱ्यांनी नाना पटोलेंकडे केली. त्यामुळे मी गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी नाव असलेल्या स्थानिक गुंडाला मी शिव्या देऊ शकतो आणि वेळ पडली तर मी त्याला मारू शकतो, असे म्हटले. मात्र मी देशाच्या पंतप्रधानांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करू शकत नाही.

त्यानंतरही भाजपकडून पटोलेंवर टीका सुरूच आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ट्वीट केले आहे. त्यात गडकरी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान श्री

नरेंद्र मोदी जी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.

दरम्यान नारायण राणे यांनीही नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे


 

Tags:    

Similar News