'या' तारखेला पुर्ण होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक - बनसोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नेमके कधी होणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन आम्ही करणार आहोत असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे

Update: 2021-08-01 05:02 GMT

नांदेड  : 14 एप्रिल 2023 ला मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे उद्घाटन आम्ही करणार आहोत असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले ते नांदेड येथे एका कार्यक्रमाला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे 15 ते 20 टक्के काम पुर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. सोबतच मंत्री नितीन राऊत, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड हे देखील स्मारकाचे काम किती उत्तम होईल यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बोलतांना, आम्ही पूरग्रस्त लोकांपर्यंत दहा हजारांची तातडीची मदत पाठवली आहे, थोड्याच दिवसांमध्ये सविस्तर बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी पंचनामे झाले आहे, काही ठिकाणी पंचनामे बाकी आहेत. नुकसानीचा संपुर्ण आढावा घेतल्यानंतरच मदतीचे पॅकेज ठरवता येईल असं मंत्री बनसोडे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाबाबत राजकारण होत आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे नेते याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीच भेटले आहेत. राज्य सरकार म्हणून जे-जे काही करणं गरजेचं होत ते आम्ही केलं आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. अजूनही आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकार पुढचा निर्णय घेईल असंही बनसोडे यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News