रेशन आणि रोजगारासाठी आदिवासींचे अन्नत्याग आंदोलन

Update: 2020-05-31 00:44 GMT

गेल्या पाच दिवसांपासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी (Adivasi) बांधवानी आपल्या रोजगार आणि रेशन हक्कांसाठी हक्काग्रह सुरू केला आहे. दररोज ठाणे रायगड, (Thane Raigad) पालघर (Palghar) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यातील प्रत्येला तहसिल कार्यालयासमोर 50 - 50 आदिवासी बांधव शारीरिक अंतर पाळून आपल्या हक्कासाठी हक्काग्रह करत आहेत. पण पोलिसांनी 2500 आदिवासींवर गुन्हे दाखल केले आहेत.

याविरोधात श्रमजीवी संघटनेचे तीन प्रमुख नेते आजपासून "अन्नसत्याग्रह" करणार आहेत. याचप्रमाणे ठाणे ,पालघर,रायगड आणि नाशिक जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष आणि चार ज्येष्ठ कार्यकर्ते अन्न सत्याग्रह करणार आहेत, अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिली आहे.

हे ही वाचा...


मोदी सरकारच्या १ वर्षातील निर्णयांचा अर्थ काय?

मोदी सरकारचं यश आणि अपयश

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

सत्याग्रहाच्या ठिकाणी संघटेनेचे सभासद मिळेल त्या वाहनाने किंवा पायी येणार आहेत. आतापर्यंत शांततेत 50-50 लोकांच्या मर्यादेत सुरू असलेले हे हक्काग्रह आता गर्दीची मर्यादा ओलांडून तीव्र करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. सविनय कायदेभंग असला तरी आम्ही शासनाच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याविषयक सर्व सूचनांचे काटेकोर पालन करू अशी माहिती श्रमजीवी संघटनेनेकडून देण्यात आली आहे.

Similar News