डॉ.समिना दलवाईंवर कारवाई जागतिक स्तरावर नोंदवला जातोय निषेध

Update: 2024-01-08 12:48 GMT

डॉ. समीना दलवाई यांच्याविरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी आणि धर्माच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. समीना ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीतील विधि शाखेच्या प्राध्यापक व स्त्रीवादी लेखिका आहेत.

लैंगिक विषयावर लेक्चर आणि डाॅ. समिना अडचणीत

विद्यार्थ्यांना जागतिक कटू सत्य समजावून सांगणे गुन्हा आहे काय आजूबाजुच्या राजकीय सामाजिक समस्यांचा सामना करण्यासाठी सक्षम करणे हे शिक्षकांचे कार्य असते. डॉ. समीना यांनी लैंगिक विषयावर लेक्चर देताना तेच केले.त्यांच्या विरोधात एकाही विद्यार्थ्यांची तक्रार नाही. त्यांनी महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याचा आरोप करून डॉ.समीना यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. हा आरोप हरियाणा महिला आयोगाणे केला आहे. तर 'भाजपशासित हरियाणात महाराष्ट्रकन्या लेखिका डॉ.समिना दलवाई या मुस्लिम धर्मीय असल्याने त्यांचा भयंकर छळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आसल्याच शिवसेना मुखपञ सामनातुन म्हणल आहे. 

कोण आहेत डॉ. समीना दलवाई

डॉ. समीना दलवाई ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीतील विधि शाखेच्या प्राध्यापक व स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेतून मोठ्या प्रमानवर बौद्धीक लिखाण केले आहे. डॉ.समीना यांनी सतत कष्टकरी दलित व अल्पसंख्यक यांच्यावरील होणाऱ्या भेदभावावर प्रकाश टाकला आहे. मुस्लिमधर्मीय असलेल्या डॉ.समीना यांना भाजपशासित हरियाणात धर्मांधतेचा कटू अनुभव घ्यावा लागत आहे. यांच्याविरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी आणि धर्माच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हरियाणा महिला आयोगाच्या शैक्षणिक क्षेत्रातील या नाहक हस्तक्षेपाचा जागतिक स्तरावरून तीव्र निषेध होऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरुण डॉ. समिना यांना समर्थन

राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४०० हून अधिक नामवंत बुद्धिजीवी, प्राध्यापक, अभ्यासक व इतिहास संशोधकांनी डॉ. समीना दलवाई यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ‘मुस्लिम ओळख व विशिष्ट राजकीय विचारसरणीमुळे डॉ. समीना दलवाई यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून त्यांची होणारी ही छळवणूक तातडीने थांबवावी व गुन्हा रद्द करावा’, अशी मागणी या मान्यवरांनी रविवारी जाहीर निवेदनाद्वारे केली आहे.

वर्गातील शिकवण्याच्या पद्धतीविरोधात पहिल्यांदाच प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातील खुली चर्चा करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भीती व्यक्त होत आहे. एकाही विद्यार्थ्यांने तक्रार केली नसतानाही राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून डॉ. दलवाईं विरोधात २२ डिसेंबरला कलम ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.‘हुकुमशाही प्रवृत्तीच्या राजवटी बुद्धिवादी मूल्यमापनात्मक विचारसरणी आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या बुद्धिजीवींना घाबरतात. भारतातील विद्यापीठांवर सातत्याने होत असलेल्या अशा हल्ल्यांच्या मालिकेत प्रा. दलवाईं विरोधातील कारवाई हे ताजे उदाहरण म्हणता येईल’, असे स्पष्ट मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

Similar News