राज्यात २४ तासात कोरोनाचे ७ हजार ८६३ नवे रुग्ण

Update: 2021-03-02 15:10 GMT

राज्यात गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात राज्च ७ हजार ८६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात राज्यात ५४ कोरोना बाधित रुग्णाांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्य दर २.४१ % एवढा आहे. तर २४ तासात ६ हजार ३३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९% एवढे झाले आहे. राज्यात सध्या एकूण ७९ हजार ०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


 राज्यात गेल्या २४ तासात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ८४९ रुग्ण आढळले असून केवळ २ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण नागपूरमध्ये आढळले असून ही संख्या ८०९ आहे तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ४८३ रुग्ण आढळले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात ७०३ रुग्ण, नाशिकमध्ये १३९, औरंगाबादमध्ये १२८, जळगावमध्ये २५२ रुग्णांची नोंद झाली आहे.




 




 


Tags:    

Similar News