'काळे कायदे मागे घ्या', 'आप' खासदारांची पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी

गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांचं समर्थन करत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींसमोर अनपेक्षितपणे घोषणाबाजी सुरू केली.

Update: 2020-12-25 10:16 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या खासदारांकडून 'शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या' अशी घोषणाबाजी करण्यात आली. कृषी कायद्याविरोधात गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसलेत. या आंदोलकांच्या समर्थनार्थ आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींसमोर अनपेक्षितपणे घोषणाबाजी सुरू केली.

स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, वकील मदन मोहन मालविय तसंच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संसद भवनात दाखल झाले. यावेळी, आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी त्यांच्या हातात फलकही होते. 'आप'चे खासदार भगवंत मान आणि संजय सिंग यांनी घोषणाबाजी करून पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Full View
Tags:    

Similar News