मराठवाड्यात अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

मराठवाड्यात अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या a farmer commits suicide after loss of crops due to heavy rain in beed district

Update: 2021-09-11 12:26 GMT

गेल्या काही दिवसात मराठ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत इथे दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत होते. पण आता अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले म्हणून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यातील मारफळा गावातील विलास लक्ष्मण माने या शेतकऱ्यांने अतिवृष्टी व कर्जबाजारीपणा यामुळे या आत्महत्या केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृत शेतकरी विलास माने यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या टाकरवन शाखेचे 1 लाख रुपये कर्ज होते. माने यांची पाच एकर शेती आहे. त्यांना दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ कामानिमित्त बाहेरगावी असतो. तर आई -वडील व पत्नी आणि दोन मुले यांच्या ते राहत होते. माने यांची शेतीवरच उपजिविका होती. पण गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. माने यांच्या शेतामधील पिकंही हातची गेल्याने हताश झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Tags:    

Similar News