अल्पवयीन मुलीच्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या २०० जणांवर गुन्हा दाखल.

बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथे बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली होती परंतु पथक पोहोचण्या अगोदरच लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून नवरदेवासह दोन्ही कडील नातेवाईक,फोटोग्राफर, मंडपवाला, भटजीसह जवळपास 200 नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या लग्नानंतर गावातील सर्वच लोक पळून गेले आहेत.

Update: 2023-03-14 03:57 GMT

परळी तालुक्यातील नंदागौळ येथील आदिनाथ गोविंद गीते (वय 24) याचा विवाह चोपनवाडी ता. आंबेजोगाई येथील 16 वर्षीय मुली सोबत रविवारी 11 वाजता नियोजित होता. ही माहिती 1098 क्रमांकावर चाईल्ड लाईनला मिळाली होती. चाईल्ड लाईनचे संतोष रेपे (Santosh Repe) यांनी ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांना माहिती दिली. या सर्वांनी दुपारी एकच्या दरम्यान विवाह स्थळाला भेट दिली असता त्या ठिकाणी लग्नाचे सर्व साहित्य आढळून आले.त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

या अगोदरच लग्न लावून वधू वरासह सर्व नातेवाईक पसार झाल्याने पोलिसांच्या हाती कोणीच लागले नाही. अखेर ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नवरदेव व नवरीचे आई-वडील, दोघांचे मामा मंडप वाला, फोटोग्राफर स्वयंपाक वाला आचारी यांच्यासह जवळपास 200 वराडी मंडळी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक गणेश झांबरे करत आहेत.

Tags:    

Similar News